मुर्तीजापूरात  कारवाई.

कोरोना विरुद्ध नियमांचे उलंघन करणाऱ्यांना चपराक

१ लाख ६७ हजार ९०० वसुल न.पा.प्रशासनाची दंडात्मक कारवाई

सध्या संपूर्ण देशात संचारबंदी आहे या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूमुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सक्षम प्राधिकारी यांना नगरपालीका स्तरावर सर्व मुख्याधिकारी यांना सार्वजनिक स्थळी ( रस्ते ,बाजार ,रुग्णालय बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालय ,इत्यादी ) ठिकाणी थुंकणे यावर 300 रुपये दंड .सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावणे 200 रुपये दंड. दुकानदार / फळभाजी विक्रेते / सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते / इ. आणि ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सींग न राखणे, विक्रेत्याने मार्किंग न करणे इ.200 रुपये (ग्राहक/ व्यक्ती) 2000 रुपये दंड (आस्थापना,मालक, दुकानदार, विक्रेता ) आदेश स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना लागू असेल असे आदेश 15 एप्रिल 2019 रोजी प्रा. संजय खडसे अप्पर जिल्हा दंडाधिकारी अकोला यांच्या स्वाक्षरीने निर्गमीत झालेले आहे या आदेशाची अंमलबजावणी करीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर न पाळणे या बाबी खाली आज दी.२२ जुन पर्यंत न.पा.प्रशासनाने १ लाख ६७ हजार ९०० रूपये ३१३ नागरिक व ५२ प्रतिष्ठानावर दंडात्मक कारवाई करून वसुल करण्यात आली. सदर कारवाई मोहीम मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम पोटे,विजय लकडे, मशरुल खान,गजानन पवार, शालिगाम यादव,चेतन मिलांदे,सुर्यवंशी,गौरव मिलांदे .आरोग्य पथकाने केली

अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *