किसान क्रेडिट कार्ड

*किसान क्रेडिट कार्ड सत्य काय*

*स्मार्ट किसान*
लाईक करा फेसबुक पेज ला https://bit.ly/2CLmbUS

*बऱ्याच गृप वर सध्या किसान क्रेडिट कार्ड काढून मिळेल…….*

असा मेसेज फिरतोय त्यामुळे यांबदल सविस्तर लिहतोय……..
मित्रांनो ,किसान क्रेडीट कार्ड ही काही नवीन योजना नाही ती ऑगस्ट 1998 पासून नाबार्ड च्या मार्गदर्शन खाली अनेक बँका ही योजना राबवत आहेत.

किसान क्रेडिट कार्ड ( म्हणजेच जे आपण वर्षांनुवर्षे घेत आलेलं पीक कर्ज किंवा crop loan) याला हे नाव देण्या मागचं कारण अस आहे की आपण जे बँके तुन पिक कर्ज घेतो ते CASH CREDIT account असते जसं की इतर उद्योग करणारे बँका कडून CC घेतात तसच. आणि या account चे आपण बँकेतून cheque book पण घेऊ शकतो आणि याच अकाउंट चे आपल्याला एक ATM card सारखे कार्ड पण मिळू शकते त्यालाच किसान क्रेडीट कार्ड म्हणतात.

1) पिक कर्ज हे तुम्ही घेत असलेले पीक आणि तुमची शेत जमीन किती आहे यावर ठरतेय…..प्रत्येक जिल्ह्याला एक lead bank (अग्रणी बँक ) असते आणि ती दरवर्षी बँके ला scale of finance ठरवून देते त्यानुसार बँक ही शेतकऱ्याला पीक कर्ज देत असते.

उदा. जर ऊसा चा scale of finance प्रति एकरी 50000 असेल आणि तुमच्या कडे 2 एकर जमीन असेल तर तुम्ही 2*50000=100000 एक लाख पर्यंत पीक कर्ज घेण्यासाठी पात्र असतात.( यात manager त्याच्या power मध्ये आणखी 30% म्हणजे 30000 वाढवू शकतो) म्हणजे वरील उदाहरण प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त 130000 पर्यंत पीक कर्ज म्हणजे KCC (KISAN CREDIT CARD मिळू शकते.)

तुम्ही ही कर्जाची रक्कम एकदाच तुमच्या खात्यातून काढू शकता किंवा याच ACCOUNT चे किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकता आणि तुमच्या गरजे प्रमाणे रक्कम काढू शकता. याचा फायदा असा होतो की समजा सध्या तुम्हाला फक्त 50000 रुपायचीच गरज आहे तर तुम्ही फक्त 50000 रुपये च काढू शकता आणि तुम्हाला तुम्ही काढलेल्या म्हणजे 50000 वर च फक्त व्याज लागते आणि परत तुमच्या कडे पैसे आले तर परत तुम्ही या खात्यात जमा करू शकता म्हणजे तुम्हाला त्यावर व्याज द्यावे लागणार नाही या खात्यातून कितीदा पैसे काढावे आणि भरावे यावर कोणतेही बंधन नसते.

2) यामध्ये 1.60 लाख पर्यंत तुम्हाला जमीन तारण म्हणून द्यावी लागत नाही पन तुमच्या पिकांचे HYPOTHECATION बँके कडे असते…(जर तुम्ही कर्ज परत केले नाही तर बँक तुमचे पीक विकून कर्जाची भरपाई करू शकते).

3) व्याज दर: या योजने अंतर्गत 3 लाखा पर्यंत 7% व्याज असते पण तुम्ही वेळेत भरणा केला तर तुम्हाला Prompt Repayment म्हनून 3% व्याज परत केले जाते.

4) किसान क्रेडिट कार्ड काढून मिळेल.. अश्या जाहीराती आताच का सुरू झाल्या….?
तर फेब्रुवारी 2019 पासून केंद्र सरकारने प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 6000 देणायचे जाहीर केलेले आहे.
त्यानुसार सरकारचे अस म्हणणे आहे की जर PM किसान च्या लाभार्थ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळत असतील तर या सर्व लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन आहे व ज्या शेतकऱ्यांनी या आधी पिक कर्ज(KCC ) घेतलेलं नसेल अश्या शेतकऱ्यांना बँकेने पीक कर्ज द्यावे (आणि याच योजने ला PM-KISAN असे नाव दिले आहे)

*आता तुम्ही हे पीक कर्ज (KCC) घेण्या साठी सरळ बँके त जाऊन अर्ज करू शकतात किंवा CSC मध्ये जाऊन ऑनलाईन पण अर्ज करू शकतात. म्हणजे CSC ची भूमिका ही फक्त तुमचा अर्ज करून देण्या इथं पर्यंत च आहे बाकी शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी बँके त जे कागदपत्रे द्यावे लागतात ते बँके त जाऊन सगळे कागद पत्रे द्यावेच लागनार आहेत.*

*त्यामुळे कोणीही याला (किसान क्रेडिट कार्ड काढून मिळेल या जाहिराती ला )बळी न पडता जर तुमचे कुठेही पीक कर्ज नसेल आणि तुमच्या खात्यावर प्रधान मंत्री सन्मान निधी चे 2000 रुपये मिळत असतील तर बँकेत जाऊन अर्ज करावा आणि कागदपत्रांची पूर्तता करून आपले KCC कार्ड मिळवावे.*

आणि तुमच्या नावावर 2000 रुपये नसतील येत पण तुमचे कुठेही पीक कर्ज नाही आणि तुमच्या नावावर शेत जमीन आहे तरीही तुम्ही KCC साठी बँकेत अर्ज करू शकता.
-राधेश्याम होंडे
बँक अधिकारी

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *