खापरवाडा येथे दारूबंदी

🙏 अवैद्य देशी दारू बंदी 🙏 खापरवाडा ग्रामपंचायत ने 20 ते 25 वर्षा पासून सुरु असलेली अवैद्य दारू जी दहशत निर्माण करून चालू होती तिच्यावर योग्य नियोजन करून अंकुश लावण्यात यश मिळविले आहे.माना पोलीस स्टेशन सोबत योग्य संवाद साधून महिला ग्रामसभेचा ठराव, महिला वर्गाचे सहीचे निवेदन माना पोलीस स्टेशनची नेहमी येणारी अडचण स्पॉट वर अवैद्य देशी दारू पकडल्यावर पंचनाम्या वर कोणताच गावकरी सही करीत नव्हता ती अडचण मा. सरपंच शुभांगी सरोदे व मा. उपसरपंच सविता गवई यांनी स्वतः हजर राहून सही केली. ग्रामपंचायत खापरवाडा गावाबद्दल व गावातील देशी दारूच्या आहारी गेलेला तरुण वर्ग कष्ट करी महिला वर्ग ज्यांचे घरातील पुरुष वर्ग दारूच्या आहारी जाऊन संपूर्ण घराची राख रांगोळी केली आहे. घरातील दारूच्या व्येसणाने त्या घरातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे या सर्वांची दखल घेऊन स्वतः पुढाकार घेतल्या बद्दल माना पोलीस स्टेशन सह संपूर्ण गावकरी समाधाना वेक्त करून अभिनंदना सह आदर वेक्त करीत आहे. 🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )

महत्वाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *