अभिष्टचिंतन-ह.भ.प.प्रभाकरराव दिवनाले

सेवानिवृत्तीनंंतरचे जिवन कसे आनंदात जगावे याचे उदाहरण म्हणजे एस.टी.महामंडळातून निवृत झाल्यावर समाजप्रबोधनात रममाण झालेले प्रभाकरराव दिवनाले. संन्यस्त जिवन जगन्यासाठी हिमालयातच जावे लागते असे नाही. संसारात राहून निवृत्त राहने म्हणजे राग,लोभ,मत्सर, आनंद, दुख यांच्याकडे त्रयस्थ नजरेने बघने.मा.प्रभाकररावाच्या वागण्यातून व लिखाणातून असे जाणवते की ते हळूहळू मन निर्मोही करण्याचा अभ्यास करत आहेत.मागील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे ज्ञानेश्वरी सप्ताहात त्यांचे ज्ञानेश्वरीवर व्याख्यान/किर्तन ऐकले,त्यांच्या सोबत ह.भ.प.गुरव महाराज, अकोटचे महाराज व वारीतील गोतावळा पाहिला,अनुभवला. या सर्व मंडळीला जिवनातील खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली सापडली असे जाणवले.
आज ह.भ.प.प्रभाकरराव दिवनाले यांचा वाढदिवस आहे,त्यांना आमच्या नाशिकच्या सर्व मित्रमंडळाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
💐 🎂 .विनायक काळदाते, ईंजी. विनोद ढोरे,सदाशिव वाघ.

अकोला, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *