
मुर्तीजापूर तालुक्यात 8 ते 10टक्के पेरण्या झाल्या असून ज्यांची पेरणी आटोपली ते पावसाची वाट पाहत आहेत तर ज्यांची पेरणी बाकी आहे ते चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत.या आठवड्यात तुरळक ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने नोंदवलेला आहे तो खालील प्रमाणे असेल.
दि.25 जून गुरू. पावसाची शक्यता 50%
दि.26 शुक्र. पावसाची शक्यता 50 टक्के
दि.27 शनी.व 28 रवी. तुरळक पाउस.
दि.29 सोम.30 मंगळ. 50ते 60टक्के शक्यता.
बुधवार दि.1जूलै रोजी दाट म्हणजे 80 टक्के शक्यता.
2जूलै गुरु.50टक्के
3जूलै शुक्र. दाट म्हणजे 80 टक्के शक्यता.
या कालावधीमध्ये तापमान 31 ते 33 डिग्री असेल.
शेतकरी बांधवानी कृषिविभागाच्या सल्ल्यानुसार योग्य निर्णय घ्यावा.