दिव्यांग समस्या निवेदन-श्री.सुधिर कडू.

प्रेस नोट
दिव्यांगांच्या समस्या सोडण्याबाबत पालक मंत्री यांना देण्यात निवेदन आले
प्रतिनिधी / मुर्तीजापुर
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार संघटना अकोला चा वतीने दिव्यांगांच्या विविध प्रश्न व समस्या सोडविण्या बाबत निवेदन जिल्हा अकोला पालकमंत्री माननीय बच्चू कडू यांना24/6/2020 रोजी संत गाडगे महाराज गौरक्षण मूर्तिजापूर येथे देण्यात आले या निवेदनामध्ये 1)महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत शासन निर्णयानुसार दिव्यांगांना काम मिळणेबाबत .2) संजय गांधी निराधार योजनेमध्ये दिव्यांगांना पाच हजार रुपये दरमहा मानधन मिळण्याबाबत 3) दिव्यांगांना व्यवसायाकरिता शासन निर्णयानुसार 200 फूट जागा देणे 4) दिव्यांगांना नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणून मिळणारा पाच टक्के निधी दिव्यांगा देण्याबाबत 5) दिव्यांगांना विनाअट घरकुल देण्याबाबत 6) राज्यातील एक दिव्यांग प्रतिनिधी विधानपरिषद वर घेण्याबाबत 7) दिव्यांगांना शासकीय तसेच अशासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळण्याबाबत 8) दिव्यांगांना महाराष्ट्र शासनाच्या शिव भोजन थाली या योजनेचा लाभाकरिता प्रधान्य देण्याबाबत 9) प्रत्येक दिव्यांगांना शासनाच्या निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्याबाबत 10) जिल्हा परिषद मधील ईरा सिंघल या नावाने चालू केलेली दिव्यांग पेन्शन योजना 2019 20 चा लाभ देण्याबाबत
वरील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार संघटना यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून निवेदन देण्यात आले दिव्यांग बेरोजगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री सुधीर कडू व तालुका अध्यक्ष अनिल सरदार तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे दिलीप सरदार प्रवीण फुले सर नुरखॉ आधी दिव्यांग बंधू उपस्थित होते

ही बातमी आपल्या दैनिकात लावून दिव्यांना सहकार्य करावे
आपला नम्र
सुधीर कडू
दिव्यांग बेरोजगार संघटना विभागीय अध्यक्ष अमरावती विभाग

अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *