ग्रामपंचायत खापरवाडा-माहिती.

🙏बी बी एफ पेरणी यंत्र 🙏बी बी एफ पेरणी यंत्राने सोयाबीन पेरणी केल्यास सहा तसा मागे खोल सरी पडते त्यामुळे कमी पाऊस झाल्यास पाणी वाहून न जाता शेतात मुरते त्यामुळे पिकाची पाण्याची गरज पाण्यामध्ये खंड पडल्यास भरून निघते. जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून न राहता जास्तीचे पाणी या सरीतून शेताच्या बाहेर निघुन जाण्यास मदत होते त्यामुळे योग्य निचारा होऊन पीक पिवडे पडत नाही तसेच सोयाबीनची पूर्ण वाढ झाल्यावर किडीचा फेलाव सहा तासाने सरी असल्यामुळे जास्त प्रमाणात होत नाही तसेच दाटी मुळे शेवटचा फवारा मारण्यासाठी होणारी अडचण या सरीमुळे दूर होते. या शेतात सरासरी पेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. आणी सर्वात महत्वाचे आपले गाव नानाजी देशमुख कृषि योजने मध्ये असल्यामुळे बी बी एफ पेरणी धारक शेतकरी वर्गाला एकरी 400 रु अनुदान मिळत आहे. आमची सर्व शेतकरी वर्गाला विनंती आहे की आपण कृषि सहायक, तसेच तत्सम अधिकारी वर्ग, कृषि मित्र, यांच्याशी वरच्यावर संपर्क साधावा आपल्या गावातील ग्रुपवर सर्वांचे फोन नंबर वरच्यावर प्रसारित करण्यात येत असतात कोणतीही अडचण असल्यास कोणत्याही वेळेस मा. सरपंच यांच्याशी संपर्क साधावा. चर्चा, माहिती, योग्य संपर्क विकासाची पहिली पायरी आहे याचा चांगल्या प्रकारे वापर करून आपल्या अडचणी सोडवाव्या. 🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )

मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *