आदर्श सरपंच-श्री.महादेवराव खांडेकर, शेलुनजिक (शेलुबोडे)

ग्रामपंचायत शेलुनजिक(शेलुबोडे)
मा. आदर्श सरपंच महादेवराव केळाजी खांडेकर.

  मा. सरपंच हे २०१७ पासुन पदावर कार्यरत आहेत त्यांनी नियुक्ती झाल्यापासुन  आजपर्यत गावामध्ये भरपुर विकास कामे केलीत. २०१८ मध्ये प्रयत्न करुन गावाकरीता RO फिल्टर बसविले. कोरोनाच्या काळामध्ये गावकर्यांच्या आरोग्याकरीता २ वेळा निर्जुंतुकीकरण फवारणी, हॅण्ड्वॉश , सॅनिटायझर,जिवन ड्रॉप इत्यादीचा वाटप केला व गावातील गटारे रस्ते JCB च्या माध्यमातुन स्वच्छ करुण  गावाला कोरोनापासुन दुर ठेवले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीला त्यांनी गावकर्याना आव्हान केले की गावकरी जर घरटॅक्स व पाणी टॅक्स १००% भरतील तर RO चे पाणी ,दळण हे ग्रामपंचायत मार्फत मोफत देण्यात येईल. गावामध्ये पाड्यावर पारधी वस्ती आहे पण बरेच पारधी लोकांना राहण्यासाठी घर / जागा  नाही. तर त्यांना जागा उपलब्ध करुण देण्याचे प्रयत्न ते SDO साहेबामार्फत ते करत आहे. तसेच जि. प. सदस्य अप्पुदादा तिडके यांचे सहकार्य गावाला लाभले आहे. जि. प. मार्फत गावामध्ये विकासकामे आणण्याकरीता ते नेहमी प्रयत्न करतात.
माहिती संकलन;- ✍️प्रा.एल.डी.सरोदे, सदस्य ग्रामपंचायत शेलुनजिक (शेलुबोडे)

ग्रामविकास, मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *