
लाखपुरी सर्कलमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
मुतिजापूर प्रतिनिधी:
मुतिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे कारण
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या धडाकेबाज पावसाने शेतात पावसाने पेरलेल्या बियाण्यावर पावसामुळे माती वाहून काकरात भरल्या गेली व शनिवार, रविवार, सोमवार च्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत हलकासा पाऊस पडला नाही तर जमिनीतील बियाणे आपोआप आतल्या आत खराब होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून लाखपुरी सर्कलमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे