
राज्यातील, देशातील कोरोनाशी आघाडीवर लढनार्या सर्व नर्सेसना कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹
प्रा.डाॅ अभिमन्यू टकले
WhatsApp 9029305502
💉🌡💊💉🌡💊💉🌡💊💉🌡🩺💉🌡💊💉🌡💊
१२मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. १२मे१८२०या दिवसी दिपधारी स्री फ्लोरेन्स नाईंटीगेल यांचा जन्म ईटाली येथे झाला होता. त्यांनी या आधुनिक परिचारिका व्यावसायाचा पाया रचला. १८५४च्या क्रिमीयन युध्दात फ्लोरेन्स नाईंटीगेल या हतात दिवा घेऊन १८०००युध्दात जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमांची काळजी घेत असत म्हणून त्यांना दिप धारी स्री म्हणून संबोधले जाते.
१९४७ला ईडिंयन नर्सिंग कौंसील कायदा संसदेत पास झाला. या कायद्यानुसार देशभर आणि जगभर परिचर्या प्रशिक्षण व व्यावसायाचा दर्जा एकच राखला जातो. भारतीय व महाराष्ट्रीयन प्रशिक्षित परिचारिका ही जगभरात सुंसंस्क्रुत समजली जाते. २००४ सर्वेक्षणानुसार देशात १४,२२,४५२ प्रशिक्षित स्री पुरूष परिचारिका होत्या. दरवर्षी १००० प्रशिक्षिण केंद्रातून १०,०००बाहेर पडतात.म्हणजे आज पर्यंत १६लाख स्री पुरूष प्रशिक्षित परिचारिका भारतात आहेत. या मध्ये एएन एम, जीएनएम,बीएस्सी, एमएसी,पिएचडी शिक्षण प्रशिक्षण झालेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात सव्वा तीन लाख प्रशिक्षित परिचारिका सरकारी खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत.
चाळीस हजार प्रशिक्षित नर्सेस सार्वजनिक सरकारी क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात आरोग्य सेवक, सेवीका, आधिपरीचालीका, परिसेवीका,पाठ्यनिर्देशक, व्याख्याता, प्राध्यापक, प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
आज या व्यवसायाचेही विज्ञानीकरण,
आधुनिकीकरण,जागतिकी करण झाले आहे.
या युगात मणुष्य जन्म हा रूग्णालयात नर्सच्या हतावरच होत आहे. आणि माणसाचा म्रुत्यु ही नर्सच्या हतावरच रूग्णालयात च होतात.
नर्स रोज च आनंदाने मनुष्य जीवनाचे स्वागत करत असते. दुखानी भरलेल्या मनाने नातेवाईकांना धिर देत म्रुत्यु झालेल्या रूग्णाला निरोप देत असते.
महाराष्ट्र राज्यात हा व्यावसाय असंघटीत असल्याने दुर्लक्षित आहे.८०च्या दशका पासून मध्यमवर्गीय या व्यवसायाकडे वळाल्या मुळे व्यावसायाचा दर्जा उंचावला आहे.
विकसनशील देशा बरोबरच विकशीत देशाच्या आरोग्य सेवेचा कणा हा पुर्ण पणे या नर्सेसच आहेत. भारत देशाच्या त्रिस्तरीय पंचायत राज मध्ये उत्कृष्ट कामगिरी या नर्सेसच करत आहेत. गाव पातळी पासून ते सुपरस्पेशालीटी रूग्णालया पर्यंत सर्व रूग्णालयाचे व्यवस्थापन या नर्सेसच सांभाळत आहेत. डाॅ फक्त प्रोशीजर करून व केस पेपरवर आदेश लिहून जातात. पण रूग्णाचे व रूग्णालयाचे व्यवस्थापन या नर्सेसच सांभाळत आहेत. डाॅ. वैद्यकिय सेवेचा मेंदू आहे आणि नर्सेस या वैद्यकीय सेवेचे ह्रदय आहेत हे मात्र नक्की. सध्या जगभर संसर्गजन्य कोरोना रोगाची साथ चालू आहे. सर्व जगभर डाॅ केसपेपर वर आदेश लिहून जात आहेत रोज डायरेक्ट आठ तास कोरोना रूग्णाची सेवा देण्याचे काम नर्सेस करत आहेत. हे योद्धे स्वतःचा संसार मुलं बाळ विसरून पिपिईचे कफन घालून मानव वशांचे कफन दूर करण्याचे काम करत आहेत. अनेक लोक कोरोना मुळे श्वसन संस्थेच्या आजाराने बिछान्यावर तडफडत आहेत याच नर्सेस शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना प्राणवायु देवून प्राण वाचवण्याचे कामं करत आहेत.अंगावरचा सर्व साज फेकून देवून आघाडीवर लढायाचे काम करत आहेत. रूग्ण सेवेच्या दिव्यांच्या वाती होऊन स्वतः जळत आहेत आणि जगाला आरोग्य दायी प्रकाश देत आहेत.
जगातील एक मेव व्यावसाय जो भ्रष्टाचार मुक्त सेवा करनारा शाही व्यावसाय आहे.या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने घोष वाक्य ठेवले आहे” सपोर्ट नर्सेस अँड मीडवाईफ”.
म्हणजे जगातील नर्सेस आणि मिडवायफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.अमेरिकेने जाहीर केले आहे सर्व नर्सेसना ग्रीन कार्ड देणार. पुर्ण भारतात नर्सेसला नक्कीच चांगले दिवस आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यात नर्सेस व्यावसाय अंधारात चाचपडत आहे. म्रुत्यु शी झुंज देणार्या माणसांना वाचवनारा व्यावसाय स्वतःच म्रुत्यु च्या बिछान्यावर पडून अंधारात चाचपडताना दिसतो आहे. आज महाराष्ट्र राज्यात नर्सेस साडेतीन लाख जरी असल्या तरी त्या आरोग्य शिक्षण, आरोग्य सेवा, रेल्वे, ईएसआय ,झेडपी, नगर पालिका, महानगरपालिका, पोलीस, खाजगी रूग्णालये अशा विभागल्या आहेत.महाराष्ट्र सरकारचे या कडे कसलेच लक्ष नाही. कारण महाराष्ट्र शासन यांना फक्त आणि फक्त पगार देते या व्यतिरिक्त नर्सिंग शिक्षण आणि व्यावसाय यांना राज्याच्या बजेट मध्ये शुन्य तरतूद आहे. मध्यम आणि गोरगरीब यांची मुलं बाळ हे शिक्षण घेत असत पण महाराष्ट्र सरकारने शिक्षणाचे बाजारी करण केले आणि सरकरी परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालये शेवटचा श्वास घेत आहेत. स्वातंत्र्य मिळून ७५वर्षे झाली आजही प्रशिक्षण महाविद्यालयात प्राचार्य, प्राध्यापक, व्याख्याता यांचे एकही पद निर्माण केलेले नाही. भारतीय परिचर्या परिषदेला खोटी प्रतिज्ञा पत्र देऊन काॅलेजेस चालवली जातात. तिच अवस्था आरोग्य विज्ञान विद्यापिठात आहे. या व्यवसायाला सर्व राज्यात स्वतंत्र संचालनालय आहेत महाराष्ट्र राज्यात नाही.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाला नर्सेसचे खरे प्रश्न समजतं नाहीत.कोरोना मुळे अनेक नर्स पॉजिटिव आल्या, येत आहेत. काही म्रुत्यु ही झाले आहेत.आजही नर्सेस कोरोना शी लढन्या साठी पिपिई किट मागत आहेत. पिपिई किट मागनारांना सेवेतून निलंबित केलं जातं. शिव्या दिल्या जातात.आजही बर्याच रूग्णालयात नर्स नी कोरोनाची ड्युटी केल्यानंतर त्यांची राहायची सोय नाही म्हणून घरी येऊन जावुन करत आहेत. ड्युटीवर जेवायला नाही. बर्याच नर्सेस दोन महिने झाले मुलाबाळात गेल्या नाहीत. परवा मालेगावला सरकारी सेवेसाठी गेलेल्या नर्सेस रात्रभर फिरत होत्या रहायची सोयच नव्हती.ससून रूग्णालयातील एक सहाय्यक अधिसेवीका यांचा छळ केल्यामुळे दुर्दैवी अंत झाला.नर्सेस नियुक्ती, बदली, बढती, प्रतिनियुक्तित या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. विशेष म्हणजे याचं रेकाॅर्डच ठेवले जात नाही. या ठिकाणी देशभर स्री पुरूष भेदभाव केला जात नाही. पण महाराष्ट्र राज्यात सर्व काही अलबेल आहे. या ठिकाणी ३०% पुरूष आणि ७०%महिला घेतल्या जातात. हा व्यावसाय लोकशाहीतील मुका व्यावसाय आहे. मुकी बिचारी कशी ही हाका अशी अवस्था झाली आहे. खाजगी क्षेत्रात वैद्यकीय व्यावसायातून प्रचंड पैसा कमवला जातो पण नर्स अ प्रशिक्षित असते. प्रशिक्षित असेल तर पगार ही रोजगार हमी कामगारा पेक्षा कमी दिला जातो.भारत देशाच्या पंतप्रधानांनी ही नर्सेसच्या सेवेचे फोन करून कौतुक केलं आहे. आज कोरोना महामारी मुळे सगळे पळून गेलेत, डाॅ केसपेपरवर आदेश लिहून जात आहेत, राजकिय नेते देशातील, राज्यातील लोकांना म्हणजे मतदारांना खायला घालने, नेवून सोडने, घेवून येने मिडीयात घोषणा करणे,पद उपभोगन्या साठी निवडणुका घेने,मिडीयात कोणी विरोधात लिहिले तर त्याचा गळा आवळने याच्यात व्यस्त आहेत. पोलीस रस्त्यावर तर नर्स रोज आठ तास रूग्णाजवळ कोरोनासी लढत आहेत. या साठी च जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे नर्स आणि मिडवायफ यांच्या पाठीशी जनतेने आणि मिडीयानेही उभा राहिले पाहिजे.नर्स आणि आरोग्य सेवा यांच्या कडे केलेले दुर्लक्ष एक दिवस मानव वंश बुडवल्या शिवाय रहाणार नाही हे सर्व जगाला कळून चुकलं आहे. कळतय पण वळत नाही असं केले तर त्या देशाच्या आरोग्य सेवेचे बारा वाजणार आहेत.कारण येथून पुढे निसर्ग निसर्ग मानव वंश नियंत्रीत करण्याचा वांर वांर प्रयत्न करणार आहे.
आघाडीवर लढणारे योधे म्हणून माझ्या जगभरातील देशातील व राज्यातील शहीद झालेल्या नर्सेसना भावपूर्ण आदरांजली. सर्वच नर्सेस आघाडी वर लढत आहेत त्यांना माझा सलाम व आंतर राष्ट्रीय नर्सेस दिनानिमीत्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.फ्लोरेन्स नाईंटीगेल यांनी लावलेला हा दिवा असाच तेवत रहावो व लोकांना आरोग्य सेवेचा प्रकाश मिळत रहावो. जय महाराष्ट्र, जय भारत.💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊