
🌹मुख्यमंत्र्यांनी स्वता गाडी चालवत गाठले पंढरपूर.🌹महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या साध्या सरळ स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या वागण्यात कुठलाही बडेजाव नसतो.याचेच प्रत्यंतर पुन्हा एकदा आले.आषाढी एकादशीला दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची पुजा असते तेव्हा मोठा गाजावाजा लवाजमा असतो.परंतु या वर्षी मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी सौ.रश्मी ठाकरे हे आपल्या स्वतःच्या खाजगी कारने मुंबईवरुन पंढरपूरला गेले.महत्त्वाचे म्हणजे या आठ ते दहा तासाच्या प्रवासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः गाडी चालवत होते.स्वता गाडी चालवत पंढरीला जाणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले.