महत्त्वाच्या घडामोडी 3जुलै 2020.

बातम्या.3जुलै 2020

मुंबई-कोरोनाबाधित रुग्णाकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे उकळल्या प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सांताक्रूझपोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ( Fir Agaist Nanavati Hospital )

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं आज निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ते अनेक दिवसांपासून इस्पितळात भरती होत्या. गुरुवारी १ वाजून ५२ मिनिटांनी हृदयविकाराच्या धटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. आज मालवणी, मालाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचनाजारी केल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक सूचना करोनाचे माइल्ड, प्रीसिम्टेमेटिक आणि एसिम्टेमेटीक रुग्णांशी संबंधित आहेत. एचआयव्ही आणि कॅन्सरच्या रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये ठेवता येणार नाही. आता त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करावा लागले. तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना लक्षणाच्या सुरुवातीपासून १० दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल.

.नवी दिल्लीः लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC)तणावाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत हे शुक्रवारी लेहला भेट देणार आहेत. लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर आणि १४ कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रावत हे सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतील. या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे शुक्रवारी लेहला भेट देणार होते. पण नंतर त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. आता CDS जनरल बिपीन रावत हे लेहला भेट देणार आहेत.

मुंबई : इंधन दरवाढीला शुक्रवारी देखील लगाम बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मात्र मागील तीन आठवड्यात झालेल्या दरवाढीचे परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. माल वाहतूक महागल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत.

पुणे-जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा करोनारुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळाला. चाचण्यांची संख्या वाढल्याने शहरसह जिल्ह्यात १२६४ एवढ्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २५ हजारापर्यंत पोहोचली आहे. तर एका दिवसात ६३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ३४४ गंभीर रुग्णांपैकी २८८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ( Coronavirus In Pune )

महत्वाची बातमी, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *