शेतातील धुरा- नारायण सरोदे.

🙏💐🌹 !! धुरा !! 🌹💐🙏शेतकरी बंधुनो आपल्या जीवनामध्ये धुरा खुप महत्वाचा आहे. या धुऱ्याकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे त्यावर आपल्या घरातील सुख, शांती व समृद्धी अवलंबून आहे.आता पेरणीचा हंगाम आहे या धुऱ्या बद्दल प्रत्येक गावात भांडणे सुरु आहे. पोलीस स्टेशन धुऱ्याच्या तक्रारीने परेशान झाले आहे.या वर शेतकरी वर्गाने विचार करण्याची आवशकता आहे आपण एक दोन तासा साठी भांडण करून आर्थिक नुकसान करणे आप आपसात मतभेद करणे योग्य आहे का? आज शेतकरी वर्गाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बी खराब निघणे, वन्य प्राण्यांचा त्रास, लहरी पाऊस त्यामधून दुबारा पेरणी, मजुराची टंचाई, शेत मालाला भाव नसणे असे अनेकविध प्रश्न असल्यावर आपआप सात चांगले संबध निर्माण होणे आवश्यक आहे ते चांगले सबंध !! धुरा !! निर्माण करू शकतो या वरून धुऱ्याचे महत्त्व किती अगाध आहे धुरा म्हणजे साक्षात !! विठू माऊली !! आहे असे म्हणणे अतिशोयक्ती वाटत असेल परंतु ते सत्य आहे ते आपल्या पूर्वजांच्या जीवनचक्रात निश्चित सापडते ते जीवन चक्र अजूनही काही शेतकरी पाडतांना दिसतात . वरील अनुभूती आपण चौकस बुद्धीने निरक्षण केल्यास आपल्या आजूबाजूला स्पष्ट आढळून येतात. एक शेतकरी आपण पाहतो जो बाजूच्या शेजारी शेतकऱ्या सोबत योग्य संवाद ठेवतो त्याच्या धुरा कोरण्याला योग्य सुसंवादातुन त्याचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो त्याने एक तास जरी आपल्या शेतात काढले तरी ते तास तो मोडत नाही. त्या शेतकऱ्या सोबत योग्य संवादातुन आपला विरोध प्रगट करीत राहतो. समोरच्या शेतात कोणतेही काम सुरु असल्यास स्वतःहून त्याच्या शेतात जाऊन विचारपूस करतो. त्याला पेरण्या मध्ये बी कमी पडल्यास आपल्या जवळ शिल्क बी त्याला देण्याचे प्रयत्न करतो. डवरे, डुंडे, लोखंडी पास, दोरखंड, बोअर मध्ये मोटार टाकण्यास मदत करणे ईत्यादि कामात हा शेतकरी आपल्याला जसा वेळ मिळेल तसा मदत करीत असतो. या मदतीचा सकारात्मक वृत्तीचा समोरच्या शेतकऱ्यावर परिणाम होऊन तो स्वतःहून मदत करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतावर तो शेतकरी नसतांना लक्ष ठेवतो. या मधून त्यांच्या मध्ये योग्य संवादाला चांगल्या प्रकारे सुरवात होते. काही वर्षाने धुरा कोरणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या वागणुकीचा पच्छाताप येऊन तो धुरा न कोरता दुरून तास काढतो त्यामधून धुरा जाड तयार होऊन गवत काडीने मजबूत होतो. अति पावसात त्या दोन्ही शेतकऱ्याच्या शेतातली माती वाहून जात नाही जमीन सुपीक होऊन उत्पनात वाढ होते. तसेच घरी या बाहेर गावी काम असल्यास दोन्ही शेतकरी एकमेकाच्या शेताची वन्य प्राण्या पासून रखवाली करतात. या सर्व सकारात्मक विचाराचा परिणाम दोन्ही शेतकऱ्याच्या कुटूंबावर होऊन शाश्वत प्रगतीला सुरवात होते यावरून !! धुरा !! किती महत्वाचा आहे. तो साक्षात !! विठू माऊली !!चा अवतार आहे हे सिद्ध होते 💐💐🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )

मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *