
हातगाव ग्रामपंचायत कडून पावसाळ्यात मुरूम टाकून रस्त्यांची कामे
मुतिजापूर प्रतिनिधी
हातगाव ग्रामपंचायत कडून पावसाळ्यात मुरूम टाकून रस्त्यांची कामे केली जात आहे संपूर्ण गावात रस्त्यांवर खड्डे पडले असून ते खड्डे बुजविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्या जात आहे अनेक दिवसांपासून हातगाव ग्रामपंचायत च्या हद्दीतील रस्ते खराब झालेले होते, अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी सांगितले मात्र रस्ते दुरुस्त होत नव्हते यावर्षी या सर्व समस्येवर लवकरच उपाययोजना करण्यात आली गावकऱ्यांना आश्चर्य वाटले यावर्षी पावसाळा सुरू झाल्याबरोबर रस्त्यांवर मुरुम टाकायला सुरुवात केली हातघाव वासियांना याचा आनंद झाला आणि गावकऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे आभार मानले