दुपारच्या बातम्या.

पुणे-कोरोना रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या कोरोना वॉरियर्सच्या जेवणात झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या जेवणात झुरळ तर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या प्रसंगी अळई निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव नाराजी आहे. या अगोदर ज्या कंपनीला जेवणाचे कंत्राट देण्यात आले होते त्यांच्या जेवणात देखील हा प्रकार उघकीस आला होता. आता नवीन कंत्राट असणाऱ्या एका खासगी कंपनीकडून अशा पध्दतीचे निकृष्ट जेवण दिले गेल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी निवेदन दिले आहे.

– मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी (3 जुलै) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने येथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यानंतर आता येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या 48 तासांत पाऊसआणखी वाढेल. परिणामी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई- भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कुठलिही कल्पना नसल्याचे म्हटले आहे. साताऱ्यात या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला. मात्र, या दौऱ्याबद्दल आपल्याला कल्पनाच नव्हती, असे उदयनराजेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर आले असता, आपण त्यांन का नाही भेटला? असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना खासदारांनी ही प्रतिक्रिया दिली.

लेह- पंतप्रधान नरेंद्र मोदींना अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मोदींनी लेह लडाखसीमारेषेवरु जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलंय. मोदींनी सीमारेषेवरील तैनात जवानांना संबोधित करताना, आपलं शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं असल्याचं म्हटलंय. जगभराने आपलं शौर्य पाहिलं असून घराघरात आपल्या शौर्याच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशाला आपला अभिमान असून आपल्या पराक्रमाची गाथा सर्वत्र गायिली जात असल्याचं मोदींनी म्हटलं.

नवीदिल्ली – स्टाफ सिलेक्शन कमिशनने हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी भरती काढली आहे. यानुसार 283 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून पगार डोळे दिपावणारा मिळणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 25 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या 283 पदांपैकी 275 पदे ही केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. यामध्ये ज्युनिअर ट्रान्सलेटर/ज्युनिअर हिन्दी ट्रान्सलेटर या जागा आहेत. तर 8 पदे ही सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी आहेत.

  • भारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत यासाठी करार केला आहे. क्लिनिकल ट्रायलच्या यशानंतर कोरोनाविरोधातील ही लस देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आयसीएमआरचा विचार आहे.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हिंदू धर्मियांसाठी कृष्ण मंदिर स्थापन करण्याची मागणी झाली आणि त्यामुळे वाद सुरू झाला.

इस्लामाबादच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीनं या मंदिरासाठी जमीन दिली होती. पण, जामिया अशर्फिया या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या मुफ्तींनी याविरोधात फतवा जारी केला आहे. इतकंच नाही तर मंदिराचं बांधकाम सुरू होऊ नये म्हणून एक वकील हायकोर्टापर्यंत पोहोचले आहेत.

कानपूरमध्ये चित्रपटाचं कथानक शोभावं अशी एक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचं एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी म्हटलं आहे.

बीडमधील एक गटविकास अधिकारी चांगलेच चर्चेत आले आहेत. गैरहजर कर्मचाऱ्यांना आदेश देवूनही हजर होत नाहीत. कामावर का गेले नाहीत असे विचारणा केले असता बोलतही नाहीत.

त्यांना बोलते करण्यासाठी दगड मारण्याशिवाय किंवा माझ्या डोक्यात मारून घेतल्याशिवाय पर्याय माझ्याकडे नाही, असे मत गटविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाची बातमी, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *