
मंगरूळ कांबे शेत रस्त्यांवर अतिक्रमणं शेतकरी पेरणी करण्यापासून वंचित✍️
मुर्तीजापूर प्रतिनिधी-
मुर्तीजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ कांबे शेत रस्त्यांवर अतिक्रमणं केल्यामुळे या शेत रस्त्यावरील शेतकरी पेरणी करण्यापासून वंचित राहत असल्यामुळे या सर्व शेत रस्त्यावरील शेलूनजीक येथील शेतकऱ्यांचे लेखी निवेदन तहसीलदार मुर्तीजापूर यांना प्रा एल डी सरोदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की मौजे मंगरूळ कांबे ते दातवी हा शेतरस्ता गेल्या तीन पिढ्यांपासून वापरात आहे ऐकावेळेस दोन बैलगाड्या या रस्त्यावरून जात येत होत्या मात्र आज सर्वे नं.103 येथे श्री.आशिष अरुणराव चोंडके यांनी अतिक्रमणं केल्यामुळे एक बैलगाडीसुद्धा जात नाही, त्यामुळे या शेतरस्तयांवरील अतिक्रमणं लवकरात लवकर खाली करावे अशी मागणी शेलूनजीकच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनावर खालील शेतकऱ्यांनी सही केलेली आहे.
प्रमोद सरोदे,विजय सरोदे,साहेबराव सरोदे,रामदास सरोदे, ओकांरराव सरोदे, उद्धवराव सरोदे, दिगांबरराव सरोदे, अवधूतराव सरोदे, गणेशराव सरोदे, नंदूभाऊ सरोदे, दिगांबरराव विठूजी सरोदे, नामदेवराव सरोदे, दामोदरराव सरोदे, माणीकराव पंडीत, नामदेव खांडेकर, प्रल्हादराव खांडेकर.