
वऱ्हाडी भाषे साठी अभिमानाची बाब …!
वऱ्हाडी भाषेतील पाठ इयत्ता १२ वी च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
- डॉ. प्रतिमाताई इंगोले (दानापुर जि अकोला गावची लेक व अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी) यांनी लिहिलेल्या ‘अकसिदिचे दाने ‘ या कथासंग्रहातील “गढी” मागील ५० वर्षे आधीचे दानापुर चे केलेले उल्लेखनीय वऱ्हाडी भाषेतील वर्णन १२ वी इयत्तेच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न सोडवण्यातील अडचणी आणि ग्रामसुधारणेसाठी निष्ठापूर्वक असणारे बापू गुरुजीसारखे समाजसेवक यासंबंधीचे वर्णन गढी या वऱ्हाडी बोलीतील कथेत केले आहे .विशेष म्हणजे या त्यांच्या “अकसिदिचे दाने” या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार भेटला आहे.