
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पोही येथे आमदार मा. अमोल मिटकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण.
आज दिनांकर २.७.२०२० रोज गुरूवारला आमदार मा. अमोल मिटकरी यांच्या शुभहस्ते शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात येऊन शाळा दुरूस्तीसाठी निवेदन देण्यात आले.
सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक सुरेश मडावी व अभिजित देशमुख यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला गावचे सरपंच किशोरभाऊ नाईक, अप्पू तिडके ( जि.प. सदस्य ) राष्ट्रवादीचे श्रीकृष्ण बोळे, रवि राठी, राम कोरडे, विल्हेकर ( जि.प. सदस्य ) गोपाल आंबिलकर ( उपसरपंच ) सदाशिव नाईक ( ग्रा. सदस्य ) विजय मुळे ( पोलीस पाटील ) व गावकरी मंडळी उपस्थीत होते.