
सोयबीन बोगस बियाणे प्रकरणी तीन कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे
राज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या.
या अनुषंगानं तीन कंपन्यांविरोधात बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणे बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यात एकट्या बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगानं ग्रीन गोल्ड कंपनी वर परळीमध्ये तर जानकी व यशोधा या कंपन्यांवर बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगानं परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सीड्स या औरंगाबादच्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे