कोहोकडी मारहाण प्रकरण-मा.आ.हरिदास भदे यांनी केला पाठपुरावा.

कोहोकडी ता.पारनेर मेंढपाळमारहाण प्रकरण-मा.आ.हरिदाजी भदे यांनी केला पाठपुरावा.

कोहोकडी ता.पारनेर जि.अहमदनगर येथे धनगर समाजाचे थोरात कुटुंबाला घरात घुसून महिला व पुरुषांना समाजकंटकानी मारहाण केली होती तसेच पारनेर पोलीस स्टेशनने थोरात कुटुंबाची फिर्याद न घेता चार पुरुष व दोन महिलांना अटक केली व त्यांच्या वर केस दाखल केली.सदर प्रकरणात सोशल मेडीवर तिव्र भावना व्यक्त होत होत्या.
समाजनेते मा.आ.हरिदास भदे,अकोला यांच्या कानावर सदर प्रकरण टाकले असता त्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना मेल करुन समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.स्थानिक आमदार श्री.लंके साहेबांना फोन करुन थोरात कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली. मा.भदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्य महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली.महिला आयोगाने त्वरित दखल घेउन अहमदनगर पोलीस अधीक्षक व पारनेर पोलीस स्टेशनला चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले.

अकोला, निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *