
जय मल्हार बंधू भगिनी…..
www.dhangarsamaj.net
आपणास नम्र विनंती की, आपली मुले तसेच मुली शिक्षण क्षेत्रात विविध यश संपादन करून नविन वाटचाल करण्यास सज्ज आहे. या वाटचालीत लग्न संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मुलीं व मुलांचे पालकांपेक्षा मुली व मुलं यांच्या अपेक्षांनी अवास्तव स्वरूप घेतलेलं आज पावलो-पावली प्रत्ययास येत आहे. अपेक्षा जरूर धरा तो तुमचा हक्क आहे….! पण खरे वास्तव पाहण्यासाठी जरा मागे वळून पहाणेही गरजेचे आहे. …..? आपला समाज….त्याची सद्य व भौगोलिक स्थिती,मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण या सर्व बाबींचे अवलोकन होणे गरजेचे आहे. मुलं व मुलींचे पालक परिस्थितीनुरूप अॅडजेसमेंट करण्यास तयार नसतात, दोन पावले मागे येण्याची त्यांची तयारी नसते. मात्र मुली व मुलांच्या पालकांची व स्वतः मुलं व मुलींची तशी तयारी नसल्याने आज मितीस अनेक मुला-मुलींचे लग्न जमविण्यास विलंब होत आहे. हा होणारा विलंब, मुला-मुलींचे वाढते वय यामुळे सामाजिक असंतुलनाची दरी निर्माण होत आहे. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. ही झाली शिकलेल्या मुला-मुलींची व्यथा. यापेक्षाही कमी शिकलेल्या मुला- मुलींच्या लग्न जमविण्याच्या व्यथा फारच कठीण आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे मुला-मुलींच्या पालकांनी दोन पावले मागे येणे….सर्व बाबी सोशल मिडियावर (व्हाटस्अप) अवलंबून राहाणे योग्य नाही. संबंध जुळवितांना संवादाची देवान-घेवाण होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष संवादातून अनेक जटील समस्यांनी सोडवणूक झालेली उदाहरणे आहेत. लग्न जमवितांना दोन कुटुंबाचा संवाद होणे महत्त्वाचे आहे. ही काळाजी गरज असून ती अपेक्षित
आहे…….
आपल्या समाज बंधू भगिनींना विनम्र विनंती की…
कोणी आपले वधू वर लग्नासाठी असतील तर त्यांनी वेबसाईट वर रेजिस्टर करावे….
सदरची वेबसाईट ही आपल्या साठी विनामूल्य आहे….
ज्यांना कोणाला रेजिस्टर करणे शक्य नसेल त्यांनी आपला पूर्ण biodata फोटो सहित whatsapp वर पाठवा….
– *एक समाज बांधव*
टीप – सदरची वेबसाईट पूर्ण पणे मोफत असून आपण आपल्या कडे असणाऱ्या व्हाट्सअप्प, फेसबुक व आपल्या नातेवाईक यांना सांगावे
ही नम्र विनंती
www.dhangarsamaj.net
अनिल शिंदे
9011844225
जय मल्हार
🙏🙏🙏🙏