
- प्रकाशवाट ग्रंथालय येथे वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी .
ग्रीन आर्मी मूर्तिजापूर चा उपक्रम.
दुसऱ्या वर्षात पदार्पण.
मुर्तीजापुर प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून शहरात व परिसरात वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम ग्रीन आर्मी च्या वतीने राबविला जात आहे. त्यानुसार आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशवाट ग्रंथालय येथे वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरा करण्यात आली.आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या २० वृक्षांचे वृक्षारोपण आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर प्रकाशवाट ग्रंथालय समता नगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कमलाकारभाऊ गावंडे, माजी न.प.उपाध्यक्ष अनिलकुमार जेठवानी, न.प. उपाध्यक्ष भारत जेठवानी, नगरसेवक सुनिल पवार,बोर्डे काका, मुर्तीजापुर स्वच्छता अभियान मुर्तीजापुर चे मार्गदर्शक सत्यनारायण तिवारी सर, रोहित सोळंके, चंदनभाऊ अग्रवाल, डॉ मुरळ, विलास नसले, विलासभाऊ वानखडे,राकेश जोशी, मेहुल दोषी, रावसाहेब अभ्यंकर, प्रा जोगळे, अरविंद निस्ताने, संजय निस्ताने,दिलीप गोसावी दिनेश श्रीवास, प्रतीक गावंडे, प्रकाशवाट प्रकल्प सदस्य मा अविनाश बाम्बल, ज्ञानेश टाले, विनोद देवके, मोहम्मद अली, ऋषिकेश वाघमारे,हर्ष अग्रवाल, हर्ष दोषी तसेच ग्रीन आर्मी, मुर्तीजापुर स्वच्छता अभियान मुर्तीजापुरचे सर्व सदस्य, समता नगर येथील समस्त नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. सर्वांनी कोरोना महामारीची विशेष काळजी घेऊन मास्क घालून, सँटायझरचा वापर करून वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सोसिअल डिस्टेंसींग ची काळजी घेण्यात आली. या प्रसंगी संपूर्ण लावलेले वृक्षाचे संगोपन करण्याची शपथ सर्व ग्रीन आर्मी सदस्यांनी घेतली.