येल्डा येथे गुरुपौर्णिमेला वृक्षारोपण-श्री.व्यंकटेश चामनर सर

अंबाजोगाई :: येल्डा पंचक्रोशी :: क्रांति सिंह नाना पाटील विद्यालय येल्डा येथे आज गुरू प्रोणिमेचे औचित्य साधून शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीरामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सरपंच मा. श्री. संभाजी शिंदे सर तर प्रमुख पाहूणे म्हणून पंचायत समिति सदस्य मा. श्री. व्यंकटेश चामनर सर, शिक्षक नेते मा.श्री. राजेश खोडवे सर उपस्थित होते. यावेळी नुतन मुख्याध्यापक मा. श्री. धावारे सरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. यावेळी येल्डा पंचक्रोशीच्या क्रांतिकारी बदलात क्रांति सिंह नाना पाटील विद्यालयाचे योगदान मोलाचे आहे. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय भगवानराव बापू लोमटे यांच्या दूरदृष्टी मुळे या दुर्गम भागातील बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. म्हणून आज येल्डा पंचक्रोशीच्या सामान्य माणसाच्या मुलांना महाराष्ट्र आणि देश पातळीवर विविध सेवेत कार्य करण्याची संधी मिळाली आहे.. आशी भावना पंचायत समितिचे सदस्य मा. श्री. व्यंकटेश चामनर सर यांनी व्यक्त केली. यावेळी गझलकार श्री. पठान सर, श्री. नरूटे सर,श्री. जोशी सर सह सर्व शिक्षक वृंदा सह येल्डा गावातील पोलिस पाटील विश्वांभर चामनर, श्री. भानुदास चामनर, श्री. भागवत मोरे यांची उपस्थिति होती.

अंबाजोगाई, ग्रामविकास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *