वन्यप्राण्यांच्या हैदोस-शेतकरी हैराण-प्रा.एल.डी.सरोदे.

वन्य प्राण्यांचा हैदोस शेतकरी चिंताग्रस्त

प्रा एल डी सरोदे

मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमधील शेतशिवारात पेरणी आटोपली मात्र आता शेतशिवारात रात्रंदिवस वन्य प्राण्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे पेरणीच्या वेळेस रानडूकरांचा भयंकर त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो पेरणीच्या सोबत तुरीचे पेरलेले बियाणे खाऊन रात्रभरात संपूर्ण शेत जमीनील तुरीचे दाणे फस्त करतात शेतकऱ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो, जमिनीत पिकं हिरवीगार होत नाही तर हरीण, सांबर,रोही,व माकडं यांचा रात्रंदिवस पिकं खाण्यासाठी शेत तुडवत राहतात ,हरीणांचे शंभराच्या आसपास कळपच्या कळप शेतात हिरवा कोवळा पाला खाण्यासाठी उड्या मारतात व संपूर्ण शेत तुडवत राहतात,रोही रात्रभर शेतात पिकं खाऊन फस्त करतात, आणि उरलेले माकडं खाऊन फस्त करतात, शेतकरी या वन्य प्राण्यांचा जाचाला कंटाळून गेला आहे, अनेक वेळा या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर रानडुक्करांने हल्ले केले शेतकऱ्यांचे हात पाय निकामी झाले, शेतकऱ्यांना आपला प्राणही गमवावे लागले, या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,आप-आपल्या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या वन्य प्राण्यांच्या समस्येवर उपाय म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करावा व काही उपाययोजना करून याची तात्काळ दखल घेण्यात आली पाहिजे,नाहीतर नवीन पिढीतील शेतकरी जमिनी कसणार नाहीत पर्यायाने देशाच्या अन्न धान्य च्या बाबतीत देश समृद्ध होणार नाही या गंभीर समस्येकडे वन विभागाने व शासनाने लक्ष केंद्रित करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

महाराष्ट्र, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *