
मशागतीचा जोर वाढला
परिसरात समाधानकारक पाउस झाल्यामुळे पेरणी साधल्या आहेत व शक्यतोवर दुबार पेरणीची गरज पडली नाही. तसेच बोगस बियाण्याच्या तक्रारी सुद्धा कमीच होत्या.
परिसरात पिकांची वाढ चांगली असुन रिमझिम पावसामुळे पिक जोमाने वाढत आहेत व सोबत तणाचा सुद्धा अडचण येत आहे.
बहुतांश शेतकऱ्यांनी डवरणीच्या कामाला सुरुवात केली असून तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.डवरणी नंतर शेतकरी निंदन काम हाती घेतात.पिकाच्या डवरणी साठी बैलजोडी आवश्यक असून ट्रँक्टर येथे काम करत नाही. ग्रामीण भागात सुद्धा बैलजोडी व ऐकूनच पशुधन कमी झाल्यामुळे डवरणीला बैलजोडी व तिन डवरे यांचा रेट दिवसाला रु.1500ते 1600 झाला आहे.डवरणीचा खर्च वाचवण्यासाठी बरेच शेतकरी तणनाशकाचा उपयोग करताना दिसत आहेत.
मजुरांना काम असल्यामुळे मजुरवर्ग सुद्धा आनंदी आहे व पिकांची चांगली वाढ असल्यामुळे शेतकरी सुद्धा समाधानी आहे.
प्रा.एल.डी.सरोदे, मुर्तीजापूर.