फडणवीसांनी जे नाकारले ते हरियाणात खट्टरांनी दिले- धनगर आरक्षण.

फडणवीसानी नाकारले ते खट्टरानी दिले.

    काल हरियाणा सरकारने ऐक नोटिफिकेशन काढून त्यांच्या राज्यातील गडरीया म्हणजे धनगर बांधवाना अनु.जातीचा दर्जा बहाल केला आणी 2014 साली लोकसभेला/विधानसभेला हरियाणा व महाराष्ट्रातील धनगरांना दिलेला शब्द भाजप सरकारने हरियाणात खरा करुन दाखवला परंतु महाराष्ट्रात कोणत्या कारणास्तव त्यांनी हे आश्वासन स्वताच मोडले हे लक्षात येत नाही. मनोहर लाल खट्टर हरियाणात करु शकतात तर आपल्या देवेंद्र फडणवीसांना ते अशक्य नव्हते परंतु त्यांनी स्वताच्या पायावर तर धोंडा पाडून घेतलाच परंतु धनगर समाजाचे पाच वर्षे खराब केली.

   हरियाणातील व महाराष्ट्रातील या आरक्षणाच्या प्रकरणावरून ऐक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आपल्या देशात जिवन मरणाच्या मुद्यांवर सुद्धा कसे राजकारण होते .राजकारण्यांना दयायचे असले तर मुद्दा सुईच्या छिद्रातून सुद्धा चपलखपणे यशस्वीपणे प्रवास करुन येतो व राजकारण करायचे ठरवले तर वेशीत सुद्धा मुद्दा दाटायला बसला अशी परिस्थिती आहे.
   हरियाणातील  सरकार खरोखर कौतुकास पात्र आहे कारण त्यांनी बेमालूमपणे दिलेले आश्वासन पूर्ण केले अन आपले पहिल्या कँबिनेटला देणारे घरी बसले.महाराष्ट्रात पूर्वी पासूनच ऐक म्हण आहे “अति शहाणा त्याचा बैल रिकामा ” ते आपल्याला व आजी माजी सरकारांना सुद्धा लागू पडते असे वाटते.आपल्या कडील तज्ञ मंडळीला जो पेच सोडता आला नाही तो हरियाणा सरकारने लिलया सोडला. त्यांनी गडरीया (धनगराची हिंदी भाषिक प्रदेशातील पोट/जात)  जात ही सांसी या जातीची समकक्ष जात घोषित केली आणि नोटिफिकेशन काढले.सांसी ही जात मुळातच अनु.जाती प्रवर्गात आहे.कुठे लोकसभा नाही, राज्यसभा नाही, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नाही किंवा अनु.जाती आयोगाकडे चक्कर मारण्याचे ठेवले नाही.
    महाराष्ट्रातील सरकारांनी प्रत्येक जातीचा प्रश्न राजकारण करुन चिघळवला असे म्हटल्यास वावगे ठरु नये.मागील सरकारने तर कहरच केला , मराठा व धनगर समाजाच्या तोंडावरुन हात फिरवून त्यांच्या आरक्षणाची वाट लावली असे दोन्ही समाजातील जाणकारांचे म्हणने आहे.ऐकाला दिलेच नाही तर दुसऱ्याला दिलेले टिकेल की नाही हे सांगता येत नाही. परंतु पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला मागे टाकून हिंदी भाषिक प्रदेश आप आपल्या प्रदेशातील पिळ सोडवताना दिसत आहेत.
    येत्या काळात नोकऱ्याच नसणार आहेत, सरकारी उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होणार आहेत आणि वय निघून गेल्यावर सोय केल्यासारखे ऐखाद्या जातीला आरक्षण जरी मिळाले तर त्याचा त्या जातीला कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही.
   परंतु महाराष्ट्रात आपले अभ्यासू माजी मुख्यमंत्री जे करु शकले नाहीत ते हरियाणात मनोहर लाल खट्टर यांनी करुन दाखवले त्यामुळे ते अभिनंदनास पात्र ठरले ऐवढेच.आमचेच सरकार देणार,पहिल्या कँबिनेट मध्ये देणार,टाटा संस्थेचा रिपोर्टची वाट पाहत आहोत व शेवटी क्या हुआ तेरा वादा म्हणत महाराष्ट्रातील भक्त भूमिगत झाले अन हरियाणवी पहिलवान धनगर आरक्षणात बाजी मारुन गेले.भाजपने हरियाणातील धनगरांसाठी वेगळा न्याय केला अन महाराष्ट्राच्या धनगरांसाठी वेगळा हे या प्रकरणातून सिद्ध झाले.

   

महत्वाची बातमी, राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *