शांतता-खेळ सुरू आहे

शांतता ! खेळ सुरू आहे !!

महाराष्ट्रातील राजकारण व समाजमन मागील दोन तिन आठवड्यापासून काहीना काही मुद्यावर ढवळून निघत आहे.वरकरणी जरी हे साधे वाटत असले तरी खोलात जाऊन विचार केल्यास असे लक्षात येईल की महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना व प्रसंग हे नैसर्गिक टाईमटेबल नुसार घडलेल्या नसाव्यात परंतु याला कुणीतरी धोरणात्मक नियंत्रीत करत आहे.वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रात उठत असलेली वादळे हे ठरवून, आखून तर उठत नाहीतना अशी जनमानसात आता कुजबुज सुरू झाली आहे.

पडळकरांच्या तोंडून वदवून घेतलेल्या वक्तव्याने आठ दिवस महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघते न निघते तोच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जनमत तापवल्या गेले.महाराष्ट्रातील मेंढपाळावर, बहुजनांवर हल्ले वाढत आहेत,हे हल्ले सुद्धा खरे आहेत की सरकारविरोधी वातावरण निर्मितीचा प्रकार आहे इथपर्यंत शंका आता जनसामान्यांना येत आहे.
कुठलीही निवडणूक किंवा काही नसतांना हरियाणा मध्ये गडरीया म्हणजे धनगर आरक्षणाची केलेली घोषणा ही ईतर राज्यातील धनगरांना तेथील सरकार विरोधात भडकवून देण्याचा सुद्धा भाग असू शकतो.मुळात ऐखाद्या जातीला अनु.जातीत किंवा अनु.जमातीत टाकण्याचा अधिकार हा राज्याकडे नसून अनु.जाती,जनजाती आयोग,पार्लमेंट व राष्ट्रपती कडे असतो.परंतु वातावरणात ढवळून काढण्यासाठी असे प्रयोग केल्या जातात.

महाराष्ट्रातील शेतकरी, नोकरदार, व्यापारी अजून कोरोनाच्या झटक्यातून सावरला नाही अन राजकारण्यांचा खेळ सुरू झालेला दिसत आहे.

महाराष्ट्र, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *