हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळून काही महिने उलटले असतानाच आता तशीच परिस्थिती राजस्थानमध्ये उद्भवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल झाल्याची बातमी सध्याच्या ट्विटर ट्रेंडिंगमध्ये चालली आहे. १२ तारखेच्या मध्यरात्रीपासूनच हा ट्रेंड पुढे जात असून रविवारी राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासोबतच भाजपकडून सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेली असल्याच्याही चर्चा आहेत.