गुरुजींसाठी आता ऑनलाईन शिक्षणाचे  प्रशिक्षण.

ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया अधिक गतीने सुरू व्हावी आणि विद्यार्थी सहभाग वाढावा यासाठी आता शिक्षकांना राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरुम ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी (ता. ११) जाहीर करण्यात आला आहे.

शाळा, विद्यार्थी, ऑनलाइन अध्यापन, गृहपाठ व सूचनांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. राज्यातील शिक्षकांसाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळपास ४५ हजार शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील टप्प्यात राज्यातील खाजगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. सदर प्रशिक्षणासाठी शिक्षक तंत्रस्नेही असावा, इंटरनेट, दोन मोबाईल, संगणकासह लॅपटॉप असणे आवश्यक आहे.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *