
नाशिक : निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर बियाणे कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्राप्त तक्रारींचा कृषी विभागाने तात्काळ न्यायनिवाडा करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सटाणा, देवळा व कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांशी आज शेतकरी संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. यानंतर सटाणा येथे पदाधिकारी व कृषी विभागाच्या बैठकीत कृषिमंत्री बोलत होते.