
सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान अर्थात चाहत्यांच्या लाडक्या सल्लुमियाने कोकणात भाताची लागवड केली आहे. त्याचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सल्लूने थेट एक संदेश देऊन टाकला आहे.
त्याने इंस्टाग्राम (Salman Khan Instagram) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्याने हे सगळे शेअर केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, दाने-दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम.
सुमारे पावणे दोन लाख चाहत्यांनी त्याच्या या फोटोला दाद दिली आहे. पनवेलजवळ सध्या तो करोनाच्या सुट्ट्या एन्जॉय करीत आहे. या फार्महाउसवर त्याचे मित्र आणि मैत्रीणही जीवनाचा आणि निसर्गाचा आनंद घेत आहेत.आ