पाउस परत येणार-हवामानाचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मंगळवार 14 जुलैपासून राज्यात पाऊस परत येत आहे. 14 ते 16 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गोवा ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा निर्माण झाल्याने राज्यातून कमी झालेला पाऊस पुन्हा वेगाने 14 जुलैपासून परत येत आहे. गेले काही दिवस मुंबई, कोकणसह, मराठवाडा, विदर्भातून पाऊस गायब झाला तो सध्या हिमालय रांगा, प. बंगाल, जम्मू-काश्मीर, झारखंड, बिहारपर्यंत मुसळधार पाऊस बरसतोय. त्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने तिकडे अतिवृष्टी सुरू आहे. 13 जूनपासून गोवा ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.

महाराष्ट्र, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *