पावसामुळे पिकांना नवसंजीवनी

मुर्तीजापूर तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी लाभली असून ऐन गरजेच्या वेळी पाउस झाल्याने बळीराजा आनंदी झाला.
पेरणीनतर पिके चांगली उगवली असून पिकांची डवरणी,निंदण व तणनाशक फवारणी आटोपली व पाउस आला.तो शेतीला उपयुक्त ठरणार आहे.
या पावसामुळे न उगवलेले बियाणे सुध्दा उगवणार असून जमिनीला योग्य आकार येउन झाडाच्या वाढीस मदत होते.
पावसामुळे भारी जमिनीत दोन दिवस काम करणे कठिण जाते व हलक्या जमिनीत त्वरित निंदण,खुरपणे सुरू होते.
ऐकून पाउस शेतीसाठी फायद्याचा झाला.

मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *