
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आली, की भारतात कोरोना व्हायरसवरील लस येत्या १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आयसीएमआरचे डायरेक्टर डॉ. भार्गवा यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर टोपे यांनी ही शक्यता वर्तवल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात कोरोनावर लस तयार झाली असल्याचे समोर आले होते. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे. मात्र, ही लस कधी लाँच होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. त्यानंतर ही लस १५ ऑगस्ट रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन बाजारात आणणं हे शक्य नाही, असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं होते.