
किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना दिले जाणारे 3 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी द्या – दादा भुसे
कृषीमंत्री दादाजी भुसे
भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात. तसेच शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी विविध राज्यातील कृषिमंत्री व संबंधित विभागाच्या महत्त्वाच्या घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये श्री.भुसे हे मालेगाव येथून सहभागी झाले होते.
यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी अशी मागणी केली की, किसान क्रेडिट कार्डचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांची मागणी असताना अनेकांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. तसेच सध्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 3 लाखांवर जे 4 टक्के व्याज आकारले जात आहे, ते माफ करून बिनव्याजी कर्ज यामाध्यमातून उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली.
पुढे बोलत असताना कृषीमंत्री म्हणाले की, बियाणे,खते खरेदी व शेतीसाठी लागणारे भांडवल यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते पण ते वेळेवर झाले पाहिले. जर सरकारने पतमर्यादा ठरवून दिली; तर शेतकरी गरजेनुसार त्या पैशाचा वापर करेल. यासह पुन्हा ही खात्यात जमा करणे अशा बाबी त्यास सोयीस्कर होतील असे त्यांनी सांगितले. तसेच किती किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले,हा मुद्दा या वेळी त्यांनी उपस्थित केला.