
लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यावर्षी दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आज सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या बारावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHE) बारावीचा निकाल 14 जुलै किंवा 15 जुलै रोजी जाहीर केला जाऊ शकतो. तर, दहावीचा निकाल लागणार जुलै महिन्याच्या अखेर लागण्याची शक्यता आहे. मात्र, एमएसबीएसएचईने महाराष्ट्र निकाल 2020 ची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही