मला सुशिक्षीतांनी धोका दिला.

मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
.. भारतीय लोकशाही जिंदाबाद💐👏💐
राज्य सरकारे का पडतात…. कार्यकाळ का पूर्ण होत नाही?????
लोकांचे प्रतिनिधित्व करणा-यांना दोष देऊन उपयोग आहे का?
1) लोकशाही व्यवस्था असताना.. मतदार पैसे घेऊन मतदान करतो. जो अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोफत दिला आहे.
2) आमदार प्रचंड प्रमाणात पैसे खर्चुन निवडून आल्यावर पैसे कसे काढायचे याच विवंचनेत असतात. तेंव्हा खरेदी- विक्री सुरू होते.
3) जो पर्यंत मतदार प्रामाणिक होता. तो पर्यंत सरकारे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत होते.
4) पक्ष निष्ठा, इमानदारी पक्ष च तिकीट वाटप करताना विक्री करतो.
5) निवडून आलेला आमदार मंत्री होण्यासाठी पैसे देतो.. आणि पैसे कमावण्याच्या नादात आपल्या च आमदारांना विसरून जातो.
5) विरोधी पक्ष कधी बेबनाव होतो.. याचिच वाट पाहत बसलेला असतो.
6)….. म्हणून जनता जो पर्यंत स्वत: प्रामाणिक पणे पैसे न घेता योग्य माणसाला आमदार म्हणून निवडून देत नाही. तो पर्यंत हे मोठ्या प्रमाणात सुरूच राहणार… बाबासाहेब म्हणतात लोक प्रतिनिधित्व करणाराला जरूर विकासासाठी प्रश्न विचारलेच पाहिजेत.. पण आपण आणि आपल्या नातलगांनी ” मतदान ” प्रामाणिक पणे केले आहे का ? नसेल तर स्वत: आत्मचिंतन करा.. दुस-यांना दोष देऊ नका… म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्विग्न पणे म्हटलेले आहे. की मुझे पढ़े लिखे लोगोंने धोखा दिया है……
प्रसंगानुरूप लेखन…
श्री. व्यंकटेश चामनर सर, अंबाजोगाई, बीड

लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *