
नाशिक, 14 जुलै : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन पावसाळ्याच्या हंगामात शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे अंदरसुल इथं संतप्त शेतकऱ्यांनी सरकारने दिलेल्या मदतीचा निषेध केला आहे. अंदरसुलच्या एका शेतकऱ्यानं सरकारला 5 हजाराच्या मदतीचा चेक परत केला आहे.
गेल्या महिन्यात निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाने मदत देण्यास सुरुवात केली असून येवल्याच्या अंदरसुल येथील शेतकरी गजानन देशमुख यांना देखील मदत मिळाली. मात्र, चेक पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते सुमारे अडीच लाख रुपयाचे तर मदत फक्त 5 हजार रुपयांची मिळाली.