
रिलायन्स समुहाच्या ४३ वर्षांतील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिहासात प्रथमच बुधवारी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी यांनी मार्गदर्शन केले. कोरोनावरील लढाई दीर्घकाळ चालणार असून त्यावरील लस उपलब्ध होताच ती देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशन करेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
समुहाच्या संचालक म्हणून निता अंबानी म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांत फाऊंडेशनने देशात ६० लाख लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. रिलायन्स फाऊंडेशन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोरोनावरील लस सापडल्यानंतर ती सर्वसामान्यपर्यंत पोहचवण्यासाठी फाऊंडेशन प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करेल.