
ह मध्यप्रदेश मधील गुना जिल्ह्यातील जगनपुर भागात वाट्याने शेती करणाऱ्या एका दलित शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला सायन्स कॉलेजसाठी देण्यात आलेली जमीन खाली करण्यासाठी पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. राजकुमार अहिरवार असं पीडित शेतकऱ्याचं नाव असून त्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर दोघांनीही कीटकनाशक पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून दोघांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
राजकुमार कसत असलेली जमीन त्यांना वाट्याने करण्यासाठी देण्यात आलेली आहे. या जमिनीत कष्ट करुन काहीतरी उगवावं या हेतूने त्यांनी पेरणी केली होती, आणि चांगलं पीकही उगवून आलं होतं.
- स्तोत्र-हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन.