अभिष्टचिंतन – प्रा.डाॅ.मधुकर सलगरे.

६५ वर्षाची गरूड भरारी. 🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅📕📕📕📕 ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला जाहीर झाले होते. मा.स्वागताध्यक्ष प्रा.संजयजी शिंगाडे सर यांनी नियोजन बैठक ठरवल्याप्रमाणे मा.संभाजी सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन यांना कळविले व चंद्रकांत हजारे प्रवक्ते यांना कळविले होते. या दोघांनी विनंती केली की आपण सलगरे सरांना येण्याची विनंती करावी. मी विनंती केली.काय आश्चर्य वयाच्या ६५व्या वर्षी सलगरे सर सकाळी ५वाजता लातूरहून सांगोला जान्यासाठी तयार झाले होते.साडे सात वाजता सोलापूर येथे आगमन झाले.संभाजी सुळ साहेबानी अगदी जोरदार हसत ओळख करून दिली. हे आमचे परम प्रिय मित्र प्राचार्य डॉ मधुकर सलगरे. मला नावाने माहिती होती परिचय नव्हता.मी विचारले रनिंग किती आहे?सलगरे सर म्हणाले वय वर्षे ६५.मग सांगोला येईपर्यंत प्राचार्य डाॅ मधुकर सलगरे यांचा परिचय व यशस्वी कर्तव्य ऐकून आंनंद झाला. या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाने घेतलेले ६५वर्षांची गरूड भरारी समाजा साठी आदर्श वत आहे. प्राचार्य डाॅ मधुकर सलगरे यांचा जन्म ११जुलै १९५५रोजी हरीहर तिर्थ ता.शिरूर जि.लातूर येथे धनगर कुंटूबात झाला. प्राथमिक शिक्षण गावी झाले.आई वडील धार्मिक व शिवपूजक होते. मधुकर सर विष्णू पुजक आहेत.त्यामुळे त्यांच्यात अहिंसा व सत्य हे गुण उपजतच आहेत.शासकिय ईजींनीयरींग काॅलेज औरंगाबाद येथे पदवी व पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. काॅलेज मध्ये शिकत असतानाच त्यांना जायकवाडी पाटबंधारे खात्यात ज्युनिअर इंजिनियर म्हणून शासकीय नोकरी मिळाली. १९७९ला इंजिनीयरींग मास्टर डिग्री मिळाली.अवघ्या १०वर्षांत १९८७ला MPSC मार्फत विभागीय प्रमुख झाले.पुढे शासकीय ईजींनीयरींग काॅलेज लातूर चे प्राचार्य म्हणून रूजू झाले.२२वर्षे प्राचार्य पदावर कार्य केले. अनेक ईजींनीयर घडवण्याचे काम केले. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ईजींनीयरींग काॅलेज ची थोडी जागा रस्त्यासाठी मागितली होती. सलगरे सरांनी सांगितलं जोपर्यंत शासकीय जि आर मला मिळत नाही तो पर्यंत मी शासकीय काॅलेजची एक इंच जागाही रोड साठी देणार नाही.नोकरी करत असताना शासना मार्फत व शोध निबंध सादर करण्यासाठी त्यांना परदेशात ही पाठवण्यात आले. इंग्लंड,रशिया,नेपाळ,सिंगापूर असे अनेक अभ्यास प्रदेश दौरेही केले. 📒📕📔📔📔📔📔📔📔📔📕 लेखक: प्राचार्य डॉ अभिमन्यू टकले 📒📚📗📗📗📗📗📗📗 त्यांना स्थानिक,राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,देश पातळीवर इंटरनॅशनल मिलेनियम पुरस्कार नवी दिल्ली २००८.असे अनेक पुरस्कार मिळाले.नियत वयोमानानुसार जुलै २०१७ मध्ये शासकीय सेवेतून निव्रुत झाले. शासकीय सेवा करत असताना त्यांनी समाज सेवा,साहित्य,धर्म,याची नाळ कधिही तुटू दिली नाही. ते विष्णू भक्त आहेत.सर्व धर्म ग्रंथाचे अभ्यासक आहेत. बौद्ध धर्माचा अभ्यास ही बर्या पैकी आहे. गेल्या २०वर्षांत अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास व लेखन ही करत आहेत. त्यांचे आता पर्यंत १०८ शोध निबंध व लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना डाॅक्टरेट पदवी मिळाली आहे. त्यांनी लिहिलेल्या साहित्य संपदा १) हिंदूस्थानचे युग पुरूष मल्हारराव होळकर. २)हिंदुस्थानी यशवंताचा इतिहास.३)माझा इतिहास भूगोलासह ४)जागतिक धर्म मंदिरांचा इतिहास ५)शोध हरीहरांचा ६)पुण्यश्लोक अहिल्या देवी. अशा तर्हेने एक सामान्य माणूस इंजिनीयर झाला.अधिकारी झाला.डाॅ. झाला. इतिहासाचा लेखक ही झाला.गरूडाला अनेक वेळा आपले कमकुवत पंख उपटून नवीन पंखानी भरारी घ्यावी लागते त्याप्रमाणे प्राचार्य डाॅ मधुकर सलगरे इंजिनीयर यांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून धर्म,शिक्षण, साहित्य क्षेत्रात ही भरारी घेत आहेत त्यांना महाराष्ट्र राज्यातील धनगर परिवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

महाराष्ट्र, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *