
जगभरातील लोक कोरोनावर लस शोधण्याच्या मागे लागले आहेत. आधी शस्त्रास्त्र स्पर्धा होती. आता लस शोधण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे कोरोनाचा जन्मदाता चीन कोरोना लस शोधल्याचे दावे करत आहे. तर अमेरिका, रशिया, ब्रिटनच नाही तर इवलासा मलेशियाही कोरोना लस शोधण्याच्या कामी लागला आहे. यामुळे कोण पहिली लस शोधतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या देशांचे स्वप्न भारताशिवाय प्रत्यक्षात येणार नाहीय.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार कोरोनाला जर हरवायचे असेल तर ही व्हॅक्सिन संपूर्ण जगासाठी आणि कमी किंमतीत उपलब्ध करावी लागणार आहे. आणि हे भारताशिवाय शक्य नाहीय. कारण भारतात जेवढ्या लस बनविल्या जातात तेवढ्या लस अख्ख्या जगात बनविल्या जात नाहीत.