3ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा माणस.

गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली, त्यात त्यांनी ही माहिती दिली. सध्याची स्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क,सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात,असे निर्देशही त्यांनी दिले.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *