
जळगाव : खानदेशातील जळगाव जिह्याचे सुपुत्र खासदार सी. आर. पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका मराठी माणसाकडे गुजरात राज्याच्या सत्तेवरील पक्षाची धुरा देण्यात आली आहे.
खासदार सी. आर. पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म पिंप्री अकारूत येथेच झाला. त्यांचे शिक्षण आय. टी. आय. पर्यंत झाले आहे. गुजरात राज्यातील सूरत येथे सन १९८९ मध्ये पोलिस कॉन्स्टेबलपदी भरती झाले होते. त्यानंतर सूरत या ठिकाणी कार्य करीत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी नवसारी महापालिकेचे महापौरपदही भूषविले आहे.