
मा.आ.हरिदासजी भदे यांचा मंत्रालयात विविध विषयाचा पाठपुरावा.
मुंबई- आज मा.आ.हरिदासजी भदे यांनी मंत्रालयातील विविध विभागांना भेट देवून मा.मंत्रीमहोदयांसोबत विविध विषयाचा पाठपुरावा केला. समाजाच्या व सोबत इतर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या कर्मचारी अधिसंख्य करण्याच्या विषयावर समितीचे अध्यक्ष मा.मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या दालनात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. समिती अध्यक्ष मा.मंत्री भुजबळ साहेबांनी या विषयावर संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे व यातून मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले.या विषयावर मा.मंत्री.वडेट्टीवार साहेब, मा.नितीन राउत साहेब यांच्या सोबत सुध्दा चर्चा केली व निवेदन दिले तसेच समाजनेते व मा.मंत्री भरणे मामा यांना मध्यस्थी करण्याची विनंती मा.भदे साहेबांनी केली यावेळेस कर्मचाऱ्यातर्फे मा.विनोद ढोरे व समाजप्रतिनिधी विनायक काळदाते सोबत होते.
समाजातील मेंढपाळांना काही जिल्ह्यात मिळणार असलेली चारातगाई व वन्यपशूंनी केलेल्या नुकसानीची प्रलंबित भरपाई साठी वनविभागाला निवेदन देण्यात आले.
मा.आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांची भेट घेऊन अकोला जिल्ह्यातील आरोग्यसेवेबद्दल मा.भदे साहेबांनी काही मागण्या केल्या व सद्य परिस्थिती अवगत केली.