कृषी शिक्षणाच्या संधी-प्रा.सौ.प्रिती शिंदे

🌳कृषी शिक्षणाची संधी 🌳

आपला देश कृषीप्रधान असून 60 ते 70टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे.देशाच्या अन्न धान्य उत्पादनात,राष्ट्रीय उत्पन्नात,रोजगार निर्मिती म्हणजे नोकरी,निर्यात या बाबतीत सुद्धा कृषीचे महत्त्व अन्यन्न साधारण आहे.इतर क्षेत्रात तेजी मंदी म्हणजे रिसेशन पहायला मिळेल परंतु शेतीक्षेत्रात कधी मंदी येउ शकत नाही कारण अन्नधान्याची गरज कधीच संपुष्टात येत नसते किंवा कमी होत नसते.आय टी क्षेत्रात, वाहन,बॅकीग,ईंजिनीअरींग, वैद्यकीय क्षेत्रात चढउतार पाहायला मिळतात परंतु देशाचे पालनपोषण करणारे कृषी क्षेत्र हे शाश्वत आहे,टिकाऊ आहे. हरितक्रांतीच्या आधी आपल्या देशाला अन्नधान्य आयात करावे लागत होते.परंतु हरितक्रांतीने शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे, शेतीची शास्त्रीय माहिती, पिकसंरक्षण,शेतमाल प्रक्रिया, बाजारपेठेची माहिती, निर्यातीच्या संधी व याक्षेत्रात नोकरीच्या संधीबाबत नवनवीन माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली.
कृषीक्षेत्राच्या प्रगतीत कृषी शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.या क्षेत्रात पदवीधर झालेल्या उमेदवारांना शेती,पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय ईत्यादी क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वता आधुनिक शेती करता येते, तसेच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन देशाची सेवा सुद्धा करता येउ शकते.कृषी पदवीधरांची शासनाच्या कृषी विभागात,बियाणे, खत कंपन्यात,शेतीमालावर प्रक्रिया,व्यापार, आयात-निर्यात करणाऱ्या कंपन्यात,शेतीला कर्ज देणाऱ्या बॅकामध्ये,कृषीचे शिक्षण व संशोधन करणाऱ्या संस्थामध्ये खुप मागणी असते.
महाराष्ट्रात कृषी शिक्षण देणारे चार कृषी विद्यापिठ आहेत व त्यांच्या अतर्गत विविध महाविद्यालयात कृषीचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात या पैकी बि.एस्सी (कृषी) हा मुलभूत व लोकप्रिय अभ्यासक्रम आहे.या अभ्यासक्रमाला बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी संलग्न असलेल्या डॉ. डी.वाय.पाटील ऐज्युकेशनल अकॅडमी मुंबईचे पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी,तळेगाव दाभाडे जि.पुणे (काॅलेज कोड 11138)येथे चार वर्षाचा बि.एस्सी (आनर्स) अॅग्रिकल्चर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून महाविद्यालयात प्रवेशाची माहिती घेणे शक्य नसल्यास खाली दिलेल्या लिंकवर आॅनलाईन नांव नोंदणी सुरू आहे .

प्रवेश प्रक्रिया महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नियमानुसार होणार असून माहिती व प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScgTpzhy8EbqGn14p6mEt9itwQgQF9raT1PMEVVsEKfVAT3QQ/viewform

सौ.प्रिती शिंदे,सहाय्यक प्राध्यापक,मृद आणि रसायन शास्त्र विभाग.पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी,तळेगांव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे.

पुणे, महाराष्ट्र, शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *