यावर्षी सोयाबीन उत्पादन वाढण्याची शक्यता.

मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत देशात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. पण जर वरुण राजाने कृपा दृष्टी दाखवली नाही तर पेरणी वाया जाईल. दरम्यान सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने (SOPA) च्या मते सोयाबीनला पुढील आठवड्यात पावसाची गरज लागेल, जर पाऊस नाही झाला तर उत्पन्नावर त्याा परिणाम होईल. दरम्यान सोपाने जुलैच्या दुसऱ्या हप्तापर्यंतचा सोयाबीन पेरणीची स्थिती आपल्या अहवालातून स्पष्ट केली आहे.

यानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पिकांची स्थिती साधरण आहे. मध्यप्रदेशात जुलै्या पहिल्या आठवड्यापर्यंत साधरण ५० टक्के पेरा झाला होता. तर बाकीची पेरणी पुढील आठवड्यात झाली. बाकी पिकांना पुढील एक किंवा दोन आठवड्यात फुले येतील. सोपा SOPAनुसार, पिकांची स्थिती व्यवस्थीत आहे, पण पुढील आठवड्यात सोयाबीनला पावसाची आवश्यकता पडू शकते.

तर निमाड परिसरातील पिकांवर पिळवा मोजॅक नावाची विषाणूचा प्रभाव दिसत आहे. या प्रदेशातील काही भागात किडीचा प्रादुर्भाव पडला होता, परंतु कीटकनाशकांच्या वापराने त्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले आहे. तर सर्वाधिक सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात निकृष्ट बियाणांमुळे २५ टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. अगाऊ लागवडीनंतर सोयाबीन पेरा उगवण्यास उशिर झाल्यानंतर निकृष्ट बियाणांचे प्रकरण समोर आले होते. दरम्यान दुबार पेरणीनंतर येथील स्थिती चांगली आहे. परंतु पुढील आठवड्यात लातूर, उस्मानाबाद, आणि बीड जिल्ह्यात पाऊस पडणे आवश्य़क असल्याचे SOPA ने सांगितले आहे.

दरम्यान कपाशीनंतरचे दुसरे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा आता ३९ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ३८ लाखाच्या आसपास आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत सोयाबीनचा पेरा २९ लाख हेक्टरच्या आसपास होता. गेल्या वर्षाची तुलना करता यंदा पेरा सद्यस्थितीत ३३ टक्के जास्त आहे. पेरणी होऊन आता दोन आठवडे झाले असून पुढील आठवड्यात शेतकऱ्यांवर वरुण राजाने कृपा केली पाहिजे. नाहीतर सोयाबीनचे उत्पादनात घट होईल यात शंका नाही.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *