
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा करोना दूर कसा पळवता येईल या कामावर लक्ष द्यावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत.उद्धव ठाकरे यांची नाशिकला येण्याची इच्छा होती. मात्र आम्ही आमचं निरीक्षण मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत. मात्र त्यांचं पूर्ण राज्यात लक्ष आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
करोनाच्या चाचण्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. ज्यात ते असं म्हणाले आहेत की या काळात राजकारण करण्यापेक्षा करोना काळात त्यांनी काम करावं आणि करोना दूर कसा घालवता येईल ते बघावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.