भाजपसाठी धोक्याची घंटा-खा.काकडे

पुणे: भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. देशात मध्यप्रदेश, राजस्थान नंतर महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या सर्व बदलत्या राजकीय समीकरणांवर काकडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भविष्यातील राजकारणावर बोलताना संजय काकडे म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, यावेळी या राजकीय घडामोडी आमच्यासाठी देखील धोक्याची घंटा असेल, काकडे आज टीव्ही ९ मराठीवर बोलत होते.

यापुढे महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविल्या तर आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार असून महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झाल्याचे काकडे म्हणाले.

राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *