आरोग्य क्षेत्रातील समाजसेवक डॉ. अभिमन्यू टकले.

🩸💊वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक डॉ. अभिमन्यू टकले.💊

वैद्यकीय क्षेत्र आपले वेगळेपण जपण्यासाठी नेहमी प्रयत्नात असते.डॉक्टर मंडळी सामान्य माणसांमध्ये वावरतांना फार कमी वेळा पाहायला मिळते.पूर्वीच्या काळी ग्रामीण जनतेला डॉ. सोबत काही बोलण्याचे ,विचारण्याचे सुद्धा अप्रुप वाटायचे अन डॉ. सुद्धा रोग्यांसोबत किंवा नातेवाईकांसोबत संवाद साधून निदान व ईलाजा बद्दल बोलत नसत.परंतु जे डॉ. गोड बोलून पेशंटला निदान, उपाय ,घ्यावयाची काळजी या बद्दल बोलतात त्या डॉ. बद्दल पेशंटला आत्मविश्वास निर्माण होतो व डॉ. च्या बोलण्यानेच पेशंट अर्धा बरा होतो असे बोलल्या जाते.असे डॉ.जनतेत व सहकार्यामध्ये प्रिय असतात ते समाजाला हवेशे वाटतात,ही मंडळी डॉ. प्रकाश आमटेच्या पठडीतील असतात.
असेच वैद्यकीय क्षेत्रातील ऐक अवलिया व्यक्तीमत्व माझ्या पाहण्यात आले ते म्हणजे मुंबई येथे कार्यरत डॉ. अभिमन्यू टकले.लाख दिड लाख पगाराचा माणूस सतरंजी वर झोपतो ,घरात टि.व्ही.नाही रेडिओवर बातम्या ऐकतो आणी पगारातील अर्धी रक्कम समाजकार्यावर खर्च करतो.समाजापुढे सार्वजनिक कामासाठी झोळी पसरवतो व मागील चार पाच वर्षापासून आदिवासी धनगर साहित्य संमेलन भरवतो.समाज कार्यात स्वताचा रुपया टाकल्यानंतरच ते समाजाला दोन रुपये टाकण्याचा आग्रह करतात.. डॉ. स्वताचे सर्वच कामे स्वताच करतात,कुठेही नोकर चाकर नाही की बडेजाव नाही.
डॉ. टकले जेथे राहतात व काम करतात तो परिसर कोरोना पेशंटनी गजबजलेला आहे तरी ते पाय घट्ट रोवून आपली ड्यूटी करत आहेत,आपल्या सहकाऱ्यांना रुग्णसेवेसाठी प्रेरित करत आहेत व कोरोना बद्दलच्या अफवा व भ्रामक कल्पना खोडून काढत आहेत.
ज्या रुग्णांना नातेवाईकांनी,मित्रांनी सुद्धा भेटीला येणे सोडले आहे अशा रुग्णांचे ते मुंबईत नातेवाईक बनून सेवा देत आहेत.मागील आठवड्यात ऐक वृत्तपत्र क्षेत्रातील व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह झाली, कुठे बेडची व्यवस्था होत नव्हती, उच्च पातळीवरुन हालचाली झाल्या आणी व्यवस्था करण्यात आली.या पेशंटला मित्र किंवा नातेवाईक सुद्धा भेटीला आले नाहीत. डॉ. टकले यांनी स्वताच्या स्वयंपाकात त्या रुग्णाचा जेवणाचा डबा तयार करून त्याला खाउ घातले,औषधोपचार केला अन मानसिक धिर दिला.हा पेशंट डॉ. च्या आधाराने तिसऱ्या दिवशी निगेटिव्ह झाला.
आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी मनात असले तर त्या क्षेत्राचा समाजसेवेसाठी उपयोग करु शकतो हे डॉ. टकले यांच्या कार्यावरुन सिद्ध होते.
✍️विनायक काळदाते

महाराष्ट्र, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *